सांगलीत लॉकडाऊन नियमांची पायमल्ली केल्याने ७ दुकानावर कारवाई तर १ दुकान सील

closed shop
closed shop

सांगली : सांगलीत Sangali लॉकडाऊन Lockdown नियमांची कडक अंमलबजावणी सुरू झाली आहे. शहरात शासनाकडून सकाळी ७ ते ११ यावेळेत अत्यावश्यक दुकानांना आणि भाजी विक्रीला परवानगी देण्यात आली आहे. मात्र ११ नंतरही अनेक आस्थापना आणि भाजी विक्री सुरू होती. यामुळे शहरात गर्दी होत असल्याने महापालिका आणि शहर पोलीस Police निरीक्षक अजय सिंधकर Ajay Sindhkar यांच्या मदतीने सांगली शहरातील व्यापारी पेठेत पाहणी केली. Violation of Sangli lockdown rules 

त्यावेळेस शासनाच्या वेळेचे निर्बंध डावलून काही दुकाने सुरू असल्याची बाब निदर्शनास आली. उघडे असलेल्या दुकानांवर सांगली महापालिकेच्या पथकाने कारवाई सुरू केली. या कारवाईत संयुक्त पथकाने सात दुकानांवर दंडात्मक कारवाई Punitive action केली आहे.  याचबरोबर गणपती Ganpathi पेठेतील एक दुकान सील करण्यात आले आहे. ११ नंतर सांगलीत अत्यावश्यक दुकाने वगळून अनेक दुकाने सुरू होते. यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे.

Edited By- Digambar Jadhav

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com